हिंगोलीः औंढा नागनाथ तालुक्यात होतात सर्वाधिक बालविवाह

Hingoli News | जिल्‍हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली यादी
Hingoli News
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

हिंगोलीः मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करू नये असे शासनाचा कायदा आहे. या वयाच्या अगोदर मुलांची लग्‍ने केल्‍यासा कायद्याने गुन्हा ठरतो. असले तरी गावोगाव या नियमाला सरार्स हरताळ फासला जातो. आता हिंगोली जिल्‍ह्यातील बालविवाहाची धक्‍कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्‍यात सर्वाधिक बालविवाह झाल्‍याचे दिसून आले आहे.

हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नुकतीच बालविवाह होणाऱ्या जिल्ह्यातील 50 गावांची तालुका निहाय यादी प्रसिद्ध केली आहे. तर संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आदी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बालविवाह थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

बालविवाह न करण्याचा कायदा शासनाने काढला असून याकडे किती पालक किंवा वधू-वराचे माता पिता लक्ष देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दहा गावांमध्ये सर्वाधिक बालविवाह होत असून औंढा नागनाथ तालुक्यात पिंपळदरी, आमदरी, काकड दाभा, जवळाबाजार, आसोला, तपोवन, शिरड शहापूर, नागेशवाडी, सिद्धेश्वर, सुरेगाव, तर हिंगोली तालुक्यातील बासंबा, नरसी नामदेव, दिग्रस, लोहगाव, फाळेगाव, कनेरगावनाका, सिरसम, माळहिवरा, खानापूर (बु), कणका, वसमत तालुक्यातील आडगाव, बाबुळगाव, गिरगाव, हटा, हयात नगर, कुरुंदा ,पांगरा शिंदे, टेंभुर्णी, आसेगाव, इंजनगाव (प), कळमनुरी तालुक्यातील मसोड, हातमाली, घोळवा, साळवा, तरोडा, गौळ बाजार, रुपुर, शेनवडी मुंधळ वाई, तर सेनगाव तालुक्यातील सुलदरी (बु)., गारखेडा, बंन कोंडवाडा, खैरखेडा, भानखेडा ,धोतरा, उटी (बु), जांभरुण आंध, जामदया, ही जिल्ह्याभरातील गावे असून यामधील वसमत तालुक्यातील बाबुळगाव हे विद्यमान आमदाराचे गाव असून कळमनुरी तालुक्यातील मसोड हे गाव विद्यमान विधान परिषद सदस्यांची आहे.

बालविवाह थांबवण्यासाठी कायदा जरी केला असला तरी आजच्या परिस्थितीनुसार मुले आणि मुली पाहता लवकर प्रेमात पडतात. मुलांनी चुकीचे पाऊल उचलू नये या कारणामुळे आई वडील बालविवाह करण्यास प्रवृत्त होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकंदर जिल्हाभरात बालविवाह थांबवण्यासाठी शासकीय यंत्रणा कितपत यशस्वी होते हे पाहणे खरोखर गंमतीशीर होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news