Aundha Cyber Fraud | मोबाईलवर APK फाईल डाउनलोड: बँक खात्यातून २ लाख ७५ हजार रुपये लंपास

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील घटना
Cyber Fraud Refund
Cyber Fraud RefundPudhari
Published on
Updated on

APK File Download Cyber Fraud

औंढा नागनाथ : मोबाईलवर अनोळखी APK फाईल डाउनलोड होताच काही मिनिटांत सेवकाच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७५ हजार रुपये ऑनलाइन वळविल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे समोर आली आहे. या प्रकरणी सायबर भामट्यांविरोधात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाख येथील माधव केंद्रे हे कंजारा येथे एका खासगी संस्थेत सेवक म्हणून काम करतात. शनिवारी (२२ ऑगस्ट) त्यांच्या मोबाईलवर अचानक एक APK फाईल डाउनलोड झाली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर तब्बल १०० ते २०० संदेश येऊ लागले. संदेशांची भाषा समजत नसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

Cyber Fraud Refund
Aundha Nagnath News | 'तुझी संधी हुकणार नाही'; पोलिस भरतीसाठी निघालेल्या अपघातग्रस्त तरुणीला कोल्हापूर पोलिसांचा दिलासा

दरम्यान, रात्री सुमारे आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे काढल्याचे संदेश आले. सुरुवातीला २५ हजार रुपये, त्यानंतर १ लाख रुपये, पुन्हा १ लाख रुपये आणि शेवटी ५० हजार रुपये, अशा चार व्यवहारांत एकूण २ लाख ७५ हजार रुपये ऑनलाइन वळविण्यात आले.

आपण कोणताही व्यवहार केला नसताना खात्यातून एवढी मोठी रक्कम कशी काढली गेली, याची खात्री करण्यासाठी केंद्रे यांनी २४ ऑगस्ट रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेत धाव घेतली. बँक अधिकाऱ्यांनी खात्याचा तपशील तपासला असता ऑनलाइन व्यवहारांद्वारे रक्कम काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

Cyber Fraud Refund
Aundha Nagnath News | औंढा नागनाथ येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाकडे अधिकाऱ्यांची पाठ; उपचाराविना जनावरांची तडफड

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रे यांनी प्रथम बँकेत तक्रार केली. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर भामट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

APK फाईलमुळे सायबर फसवणुकीचा संशय

अनोळखी APK फाईल डाउनलोड झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच खात्यातून रक्कम वळती झाल्याने या फाईलच्या माध्यमातून मोबाईल अथवा बँकिंगशी संबंधित माहितीचा गैरवापर झाला असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविकांत हरकाळ आणि संदीप चंद्रशेखर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news