Hingoli tractor accident | ट्रॅक्टर कालव्यात कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

ज्ञानेश्वर हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
Hingoli tractor accident | ट्रॅक्टर कालव्यात कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Published on
Updated on

वसमत : तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडून एका १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर उर्फ माऊली माधव कदम (वय १८, रा. अकोली) असे आहे. तो शेतीसोबत रोजमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. खरीप हंगामपूर्व मशागतीचे काम सुरू असल्याने तो ट्रॅक्टर घेऊन शेतात गेला होता.

Hingoli tractor accident | ट्रॅक्टर कालव्यात कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Tractor accident news | उतारावरील रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला; चालक ठार, दोन मजूर गंभीर जखमी

पहाटेच्या सुमारास काम आटोपून घरी परतत असताना अकोली कालव्याजवळील रस्त्यावर ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह कालव्यात कोसळले. यामध्ये ट्रॅक्टरचे हेड अंगावर पडल्याने ज्ञानेश्वर याचा जागीच मृत्यू झाला.

Hingoli tractor accident | ट्रॅक्टर कालव्यात कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Sangli Accident : ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पाहणी केली असून क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे काम सुरू होते. ज्ञानेश्वर हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news