Hingoli Accident |ट्रेलरला कारची धडक: अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

हिंगोली-कळमनुरी मार्गावरील घटना, उभ्या ट्रेलरला कारची धडक, कारमधील दोघे ठार
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

हिंगोली : हिंगोली-कळमनुरी मार्गावरील घटना, उभ्या ट्रेलरला कारची धडक हिंगोली ः हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता गावाजवळ भरधाव कार उभ्या ट्रेलरवर धडकल्याने कारमधील दोघे ठार झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्र्‌ीच्या सुमारास घडली. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

कळमनुरी येथील साईनगर भागातील रहिवासी असलेले सुरज संजय साळवे (26) व अरुण भिवाजी आम्ले (40) हे दोघे त्यांच्या कारने गुरुवारी सायंकाळी हिंगोलीत आले होते. यावेळी सुरज यांचा पुतण्या एका रुग्णालयात असल्याने त्याची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही कळमनुरीकडे निघाले होते.

दरम्यान, त्यांची कार हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता शिवारात आली असतांना समोर वाहन दुरुस्तीचे काम करीत असलेल्या ट्रेलरला कार पाठीमागून जाऊन धडकली. यामध्ये वाहनाच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक भालचंद्र मेथेकर, जमादार अनिल डुकरे, बापुराव चव्हाण, कुटे, रामराव चिभडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातातील सुरज साळवे व अरुण आम्ले यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news