Hingoli Accident |औंढा नागनाथ- जितूर रोडवर भीषण अपघात : एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर

थांबलेल्या टीप्परला पाठीमागुन आलेल्यास दुसऱ्या टिप्परची धडक
Hingoli Accident |औंढा नागनाथ- जितूर रोडवर भीषण अपघात : एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर
Hingoli Accident |औंढा नागनाथ- जितूर रोडवर भीषण अपघात : एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर
Published on
Updated on

औंढा नागनाथः औंढा नागनाथ येथे दिनांक 12/3/2026 रोजी रात्री  दोन वाजेच्या सुमारास औंढां नागनाथ ते जीतुंर जानार्या रोडवर लोकसेवा धाब्याजवळ एका भरधाव टिप्पर ने उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.

ज्यामध्ये अशोक लेलँड कंपनीचे मोठे टिप्पर MH17cv6283 हे औंढा नागनाथ कडून जिंतूर कडे जात असताना लोकसेवा धाब्याजवळ थांबले. याचवेळीा पाठी मागून येणारे छोटे अशोक लेलँड टिप्पर क्रमांक MH38X1751 हा भरधाव वेगाने येत असताना अचानक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या टिप्पर वर जाऊन आदळले.

यामध्ये क्लिनर साईडला बसलेला युवराज राजु धाबे   वय 18 वर्ष  राहणार रुपर तालुका औंढा याचा जागीच मृत्यू झाला. तर विलास अवीनाश गीते राहणार रुपुर हा गभीर जखमी झाला. सदर अपघाताची माहिती औंढा नागनाथ पोलीस स्टेशनला मिळाली असता पोलीस निरीक्षक जीएस राहिरे व पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अपघातग्रस्तांना खाजगी वाहनाच्या मदतीने औंढा नागनाथ येथे ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले दरम्यान सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी कारवाई सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news