Gajanan Maharaj Palkhi | टाळ मृदुंगाच्या गजरात श्री गजानन महाराज यांचा पालखीचे बुधवारी होणार सेनगाव नगरीत आगमन

संत गजानन महाराज पालखी सोहळा
संत गजानन महाराज पालखी सोहळा
Published on
Updated on

सेनगाव : विदर्भातील प्रति पंढरपूर संबोधल्या जाणारे बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थान शेगाव येथील श्री गजानन महाराज यांची पायी पालखी दिंडी सोहळा शेगाव ते पंढरपूर मार्गे जात असून त्यांचे आगमन विदर्भातील रिसोड येथून बुधवार १ जुलै रोजी मराठवाड्यात (सेनगाव - हिंगोली) होणार आहे.

विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून संबोधले जाणारे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री गजानन महाराज यांची शेगाव ते पंढरपूर पायी पालखी सोहळा यांचे विदर्भातील रिसोड येथून पान कनेरगाव मार्गे सेनगाव मुक्कामी मराठवाड्यात बुधवार दि.१ जुलै रोजी मराठवाड्यात आगमन होणार असल्याने सर्व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व परिसरातील भाविक दिंडी सोहळ्याची स्वागत करण्याची जयत तयारी पूर्ण केली आहे. श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळा सेनगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये मुक्कामाला थांबणार

पालखी सोहळ्यात ७०० वारकऱ्यांचा समावेश

शेगाव येथून पंढरपूर कडे प्रस्थान करणारे श्री गजानन महाराज पालखी सोहळा हा मराठवाड्यात आगमन करत असून या पालखी सोहळ्यात ७०० वारकऱ्यांचा सहभाग असून पताकाधारी, टाळ मृदुंग, बँड पथक, आरोग्य पथक, पोलीस संरक्षण पथक यासह रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार पथक यांचा प्रामुख्याने सहभाग असतो यासह श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे पंचकोशीतील हजारो भाविकांना दर्शनाचा लाभ घेतात.

वारकरी व भाविकांना १० क्विंटल बुंदीचा महाप्रसाद

शेगाव येथून येणारी श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा सेनगाव शहरात दर वर्षी येतं असलाने दिंडीतील वारकरी व भाविक भक्तांना श्रीच्या महाप्रसादाचा लाभ व्हावा यासाठी गावकरी व व्यापारी व राजकीय सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाकारातून महाप्रसादासाठी १० क्विंटल बुंदी यासह वरण भात पोळी यांचा समावेश महाप्रसादासाठी बनवण्यात येते.

श्रीच्या पालखीचे ठिकठिकाणी जंगी स्वागत

मराठवाड्यात आगमन होणाऱ्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे ठिकठिकाणी रांगोळी काढून, स्वागत कमानी उभारून भाविकाकडून जंगी स्वागत करण्यात येते तर पालखीतील वारकरी यांना ठिकठिकाणी नाश्ता फराळ चहा पाण्याची व्यवस्था भाविकांकडून केली जाते.

गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूची स्वतः काळजी घ्यावी:- संग्राम जाधव

सेनगाव शहरात श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळा येणार असल्याने वाढती गर्दी लक्षात घेता भाविक महिलांनी आपल्या अंगावरील सोन्या-चांदीचे दाग दागिने व महागडे मोबाईल अशा मूल्यवान वस्तूची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन सेनगाव स.पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी केले आहे.

सेनगाव शहरात बुधवारी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन होणार पालखी दरम्यान अप्पा स्वामी प्रवेशद्वार ते शिवाजी चौक टी पॉईंट पर्यंत रस्ता रहदारी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे पर्यायी व्यवस्था म्हणून तहसील मार्गे शिवाजी चौक टी पॉईंट या मार्गाचा अवलंब करावा गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शांततेत दर्शन घेण्याची आव्हान स. पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news