Bribe Case : अडीच हजारांची लाच घेताना ग्रामसेवक चतुर्भुज

सेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी गोरेगाव चौफुली येथे रंगेहाथ पकडले.
Bribe Case
Bribe Casepudhari photo
Published on
Updated on

Bribe Case: Gram Sevak Arrested While Accepting Bribe of ₹2,500

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

सेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी गोरेगाव चौफुली येथे रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Bribe Case
Bribe Case : सातबाऱ्यासाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात

सवना येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाच्या पाहणीचा अहवाल ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने पुढे पाठविणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदाराने ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी याच्याकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा सुरु केला होता. मात्र रामप्रसाद याने स्वाक्षरी देण्यास टाळाटाळ सुरु केली होती.

त्यानंतर त्याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोडीनंतर अडीच हजार रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सदर रक्कम बुधवारी देण्याचे ठरले होते.

Bribe Case
Bribe Case : ग्रामसेवक सोपान मुसळे लाच घेताना रंगेहात जेरबंद

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्ल, सुलभा राऊत, विजय शुक्ला यांच्या पथकाने गोरेगाव चौफुली येथे सापळा रचला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास रामप्रसाद याने तक्रारदाराकडून अडीच हजार रुपयांची लाच स्विकारताच खिल्लारी यास रंगेहात पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news