Banjara Reservation | नांदेड ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आरक्षणासाठी बंजारा समाजाचा रास्ता रोको

Hingoli Protest | हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी
Banjara Community Protest
बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन (Pudhari Photo)
Published on
Updated on

Banjara Community Protest

औंढा नागनाथ: नांदेड ते छत्रपती संभाजी नगर मार्गावर औंढा नागनाथ, जिंतूर टी पॉईंट, मुखेड येथे अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळवण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने आज (दि.१६) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, यासह इतर मागणीसाठी सकल बंजारा समाज बांधवांच्या वतीने आज दुपारी बारा ते दोन वाजे दरम्यान नांदेड ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंट येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करून मागण्याचे निवेदन तहसीलदार हरीश गाडेयांना देण्यात आले . यावेळी सर्व वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या तीन तर्फा वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या .

Banjara Community Protest
Oundha Nagnath Rainfall | औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील गोळेगाव भागात ढगफुटी सदृश्य पाऊस

या रास्ता रोकोत मुखेड विधानसभेचे आमदार डॉ.तुषार राठोड, बंजारा समाजाचे नेते बी. डी. चव्हाण, अॅड. संतोष राठोड, सुनील राठोड, डॉ. मुकेश पवार, दिलीप राठोड डॉ. मोहन राठोड, भाऊसाहेब चव्हाण आदींसह जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव या रास्ता रोको मध्ये सहभागी झाले होते. विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंदे, पो. नि. गणेश राहिरे, सहा पो निरी कैलास भगत, दत्ता कानगुले, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, संतोष पवार, अफसर पठाण, यशवंत ग्रुपपवार , जमादार गजानन गिरी, सुभाष जैताडे, यांनी बंदोबस्त ठेवला होता. रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर पोलीस यंत्रणेला एक तास वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष परिसर घ्यावे लागले.

मागील पाच दिवसापासून बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीप्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर वडचुना येथील उपोषणास बसलेले नामदेव राठोड यांचे आमरण उपोषण मान्यवरांच्या विनंतीवरून मागे घेण्यात आले. प्रवीण ऋषी यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण थांबवण्यात आली परंतु, वेळप्रसंगी आरक्षण मिळण्यासाठी परत श्वास व श्वासाचा शेवट होईपर्यंत आपण परत बंजारा समाजासाठी आमरण उपोषण करणार असल्याचे नामदेव राठोड यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी डॉ. बी. डी. चव्हाण यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. नामदेव राठोड यांनी उपोषण स्थगित केल्यामुळे प्रशासनाने मात्र एकदाचेसुटकेचा श्वास घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news