Aundha Nagnath Crime | औंढा नागनाथ येथे चोरीची घटना : 1 लाख 31 हजार रुपयांची रोकड लंपास

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला
Aundha Nagnath Crime | औंढा नागनाथ येथे चोरीची घटना : 1 लाख 31 हजार रुपयांची रोकड लंपास
Aundha Nagnath Crime | औंढा नागनाथ येथे चोरीची घटना : 1 लाख 31 हजार रुपयांची रोकड लंपास
Published on: 
Updated on: 

औंढा नागनाथ : येथील नांदेड येथे लग्नासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात कुलूप तोडून अलमारी फोडून चोरी केल्याची घटना घडली असून पोलिसांकडून तपास सुरूआहे. येथील जावई नगर येथे राहणारे शेख अब्दुल शेख अमीर यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 31 हजार रुपये रोख रक्कम लंपास केले. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख अब्दुल हे येथे लोखंड व भंगार व्यवसाय करून उपजीविका करतात. ते दि. 11 नोव्हेंबर 2026 रोजी लग्नासाठी घराला कुलूप-कोडीं लावून नांदेड येथे गेले होते.यावेळी त्यानी व्यवसायातील जमापुंजी घरातील लोखंडी अलमारीमध्ये 1 लाख 31 हजार रुपये नगदी ठेवून ते कुलूप लावून गेले होते. या दरम्यान ते दि.15 नोव्हेंबर रोजी सर्व कुटुंबासह घरी आले असता घराच् गेट तुटलेल्या अवस्थेत दिसून आल असता त्यांनी मुख्य दरवाजाकडे पाहिले तर मुख्य दरवाजाचाहि कडी-कोंडा तुटून पडलेले दिसून आले.

घरात जाऊन पाहिले असता अलमारीचेही कुलूप तोडून सामान विस्कटलेले आढळले. अलमारीतील 1 लाख 31 हजार रुपये गायब झाल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी तात्काळ औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून सहा.पोलीस उपनिरी. शेख आयुब व संदीप चंद्रशेखर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून स्थळ पाहणी केली.

औंढा नागनाथ शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना कमी अधिक प्रमाणात घडत असतात. पोलीस मात्र चोरटे पकडण्यात किती यशस्वी होतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.