औंढा नागनाथ येथे हर हर महादेवच्या गजरात रथोत्सव!

Mahashivaratri 2025 |महाशिवरात्री महोत्सव, लाखो भाविकांची उपस्‍थिती
Mahashivaratri 2025
औंढा नागनाथाच्या रथोत्‍सवाला लाखो भाविकांनी हजेरी लावली. Pudhari Photo
Published on
Updated on

औंढा नागनाथः देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे शनिवारी १ महाशिवरात्री महोत्सवात रात्री दहा वाजता हर हर महादेवच्या गजरात रथोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी नागना्थांची उत्सवमुर्ती रथामध्ये ठेऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घेण्यात आल्या. यावेळी सुमारे १ लाखांवर भाविकांची उपस्थिती होती.

औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सव सुरु आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सुमारे अडीच लाखा पेक्षा अधिक भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या रथोत्सवासाठी आज सकाळ पासूनच भाविक मंदिरात एकत्र येण्यास सुरवात झाली होती. आकर्षक फुलांनी रथाची सजावट करण्यात आली दरम्यान, रात्री आमदार संतोष बांगर, देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास नागनाथाची उत्सवमुर्ती रथामध्ये ठेवल्यानंतर प्रदक्षिणा घेण्यास सुरवात झाली. हर हर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जय, ओम नमः शिवायच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. या रथोत्सवात भजनी मंडळी, बँण्ड पथक, विद्यार्थ्यांचे पथक सहभागी झाले होते. यावेळी सुमारे एक लाखापेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती होती.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, नगराध्यक्ष सपना कनकुटे, उपनगराध्यक्ष अनिल देव, वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील भुक्तार, मुख्य पुजारी श्रीपाद भोपी, नारायण भोपी, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान १२ मार्च १९ ४८ रोजी मंदिर प्रांगणात बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेले रामचंद्र शंकरराव पाठक, गणपत पुंडलिक जोशी, रंगनाथ संतुकराव सुरवाडकर तसेच २३ फेब्रुवारी २०१२ रोजी रथोत्सव दरम्यान झालेल्या दुर्घटनेत सतीश प्रभाकर पाठक यांचा मृत्यू झाला होता या सर्व हुतात्म्यांना रथोत्सवाच्या चौथ्या फेरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख खुदुस, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाब थिटे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरुपवार, अफसर पठाण ,आदी पोलीस कर्मचार्‍यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news