

औंढा नागनाथ: औंढा नागनाथ पोलीस ठाण्यांतर्गत पुर या गावात नातीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या 73 वर्षीय आजोबा आरोपी कचरु उकडीं जोगदंड रा.पुर ता.औढां यांच्या विरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 4/12/2025 रोजी फिर्यादी पुजा रवी जोगदंड यांच्या फिर्यादीवरून औंढां नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन सदर ईसमास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील पुर या गावात अल्पवयीन नात व तिचे आजोबा दोघेच घरी होते . घरातील बाकी मंडळी शेतात कामासाठी गेली होती. यावेळी घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत विनयभंग केला मात्र त्याच्याा या कृत्याकडे दुर्लक्ष करून मुलगी चहा करीत असताना त्यांनी पुन्हा एकदा विनयभंग केला व सदर प्रकार कोणाला सांगितला तर स्वच्छतागृहात नेवुन मारून टाकतो अशी धमकी दिली .
या प्रकारामुळे ती मुलगी घाबरून गेली दोन दिवस तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही दरम्यान मात्र आजोबा कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांनी सांगितला त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सर्व परिस्थिती पाहून थेट औंढा नागनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी 73 वर्ष आजोबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जीएस राहिरे , दत्ता कानगुले, उपनिरीक्षक शेख खुदुस यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांच्या पथकाने आजोबाला ताब्यात घेतले असून सदर प्रकरणीपुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक शेख खुदुस हे करीत आहेत, सदरील प्रकार घरातील दोन भावांच्या आकासातून घडला असल्याचे दिसून येत असून आजोबा व नातीचे या विनयभंगाचे प्रकरण संशयापद दिसून येत आहे.