अन्नत्याग आंदोलनात सहभागी होण्याचे किसान पुत्र आंदोलनाचे आवाहन

Hingoli Protest | १९ मार्चरोजी जवळाबाजार येथे अन्नत्याग आंदोलन
Jwalabazar hunger strike
किसान पुत्र आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.Pudhari Photo
Published on
Updated on

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांनी पत्नी व चार अपत्यांसह पवनार येथे आत्महत्या केली होती. तेंव्हापासून आज पर्यंत शेतकरी आत्महत्येची मालिका चालू असून आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने १९ मार्च २०२५ रोजी जवळाबाजार येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती किसनपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी दिली आहे. (Hingoli Protest)

१९४७ साली देश स्वतंत्र होऊन २६ जानेवारी १९५० रोजी देशाने संविधान स्वीकारले. त्यानंतर केवळ दीड वर्षातच तत्कालीन हंगामी सरकारने १८ जून १९५१ रोजी संविधानामध्ये दुरुस्ती (बिघाड) करून शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क हिरावून घेऊन शेतकऱ्यांना गुलाम बनवल्या गेले.

१९५१ पासून आज पर्यंतच्या सर्वच सरकारांनी शेतकरी विरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांची लूट करून त्यांना कर्जबाजारी बनवले. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात दररोज ८-९ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळानंतर ७० टक्के लोक शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असताना देशात रोज ४०-४५ शेतकरी आत्महत्या करीत असत. आज निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या शेतकर्‍यांची संख्या १० टक्के झालेली असूनही आत्महत्या करणारांची संख्या मात्र ४०-४५ टक्केच कायम राहिली आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यात वाढ झालेली असूनही त्या थांबाव्यात यासाठी कोणतेही सरकार प्रयत्नशील नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बाजूने कोणताही राजकीय पक्ष नसला तरी किसानपुत्र (शेतकऱ्यांची मुले-मुली) त्यांच्या बाजूने आहेत हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये जागवण्यासाठी हा उपवास करायचा आहे. करिता जवळा बाजार परिसरातील किसानपुत्रांनी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सायंकाळी ५ वाजता एकत्र यावे, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे.

या बैठकीस मुनिर पटेल, बाजीराव चोपडे, बालाप्रसाद राठी, वसंतराव आहेर, गजानन रुद्राक्ष, विशाल रुद्राक्ष, गेंदुअप्पा विभूते, बंडू आव्हाड, बबन सोनवणे, शेख खदिर पटेल, शेख रहीम पटेल, काजी साहेब, निळकंठ डांगे, उद्धवराव आहेर, मधुकर सांगळे, सुभाषराव कछवे आदी उपस्थित होते.

Jwalabazar hunger strike
हिंगोली : घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 15 हजारांची लाच, कंत्राटी अभियंत्यासह एकजण जाळ्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news