

जवळा बाजार, पुढारी वृत्तसेवा : राजकिय क्षेत्रातील दिग्गज मंडळीकडून जवळाबाजार हे गाव सर्व पक्षातील मंडळीचा बालेकिल्ला म्हणून नावलौकिक आहे पण येथील महावितरण उपकेंद्र मध्ये वीजपुरवठा मागण्यासाठी तिन्ही घरचा पाहुणा उपाशी अभियान राबविण्यात येत असल्याने दिवसरात्र तासान्तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्व सामान्य नागरिकास मोठ्याप्रमाणात त्रास पुढाऱ्यांचा बालेकिल्ल्यात महावितरणकडून वीजपुरवठ्यासाठी भिक मागो अभियान राबविण्यात येत आहे.
जवळाबाजार हे जवळपास २० ते २२ हजार लोकसंख्येचे गाव येथे विविध शाळा महाविद्यालय बँक बाजार समिती साखर कारखान बाजारपेठ सहकारी संस्था असून येथे १३२ कुरुंदा येथून वीजपुरवठा येथील उपकेंद्र असतो. पण सध्याच परिस्थितीत जवळाबाजार परिसरात ज्याचाकडे अतिरक्तदाब पुरवठा असेल तरच तो जवळाबाजार विज पुरवठा करण्यात येत आहे. जवळाबाजार येथील ३३ के व्ही उपकेंद्र औंढानागनाथ हट्टा कुरूंदा या तिन ठिकाणावर वीजपुरवठा मिळत असतो. पण सदरील वीजपुरवठा केंद्राकडून कधी ही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार हे येथील केव्ही उपकेंद्र माहीतच नसते.
यामुळे जवळाबाजार येथील वीज ग्राहक अवस्था तिन्ही घरचा पाहुणा उपाशी झाली असून येथील १३२ केव्ही केंद्र मान्यता देण्यात आली पण राजकीय डावपेचात येथील केव्ही केंद्र इतरत्र गेले आजचा परिस्थितीत जवळाबाजार परिसरात दररोजच मोठ्याप्रमाणात वीजपुरवठा कधीही तासो तास खंडित करण्यात येत असून या गंभीर बाबीकडे विविध पक्षातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज पुढाराचा बालेकिल्ल्यात सर्वसामान्य नागरिकास वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याने दैनंदिन जीवनात मधील काम मार्गी लागण्यास विराम पडलेला आहे.
तर येथे कायमस्वरूपी व स्थानिक जवळाबाजार येथे अभियंता राहिला तर बीजपुरवठा सुरळीत सुरू राहिल नसता आजपर्यंत परंपरा पुढाराचा बालेकिल्ल्यात महावितरणची पहावयास मिळणार आहे या गंभीर बाबीची दखल घेऊन वीज ग्राहक पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक पातळीवर दखल घेऊन बीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक आहे.