'मानव विकास'च्या बसचे ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेने ६५ विद्यार्थिनी सुखरूप

हिंगोली : 'मानव विकास'च्या बसचे ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेने ६५ विद्यार्थिनी सुखरूप
Hingoli news
हिंगोली : 'मानव विकास'च्या बसचे ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेने ६५ विद्यार्थिनी सुखरूपpudhari photo
Published on
Updated on

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वटकळी येथे मानव विकास मिशनच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस एका घरावर आदळली. यामध्ये घराच्या भिंतीचे नुकसान झाले आहे. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील ६५ विद्यार्थिनी सुखरूप बचावल्या. बुधवारी सकाळी ८ वाजता हा अपघात झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या बसने विद्यार्थिनींना सेनगावकडे रवाना करण्यात आले आहे.

हिंगोली आगाराची मानव विकास मिशनची बस (एमएच ०६-एस-८६५१) बुधवारी सकाळी हिंगोली येथून सेनगाव तालुक्यातील दाताडा खुर्द या गावी गेली होती. त्यानंतर दाताडा खुर्द, दाताडा बुद्रुक, कोळसा येथील सुमारे ६५ विद्यार्थिनींना घेऊन बस सेनगावकडे निघाली होती. सदर बस सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वटकळी गावात आली असताना बसचे ब्रेक निकामी झाले. गावातून जाणाऱ्या रस्त्यामध्येच ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा चांगलाच घाम फुटला. त्यातच सकाळची वेळ असल्याने शेतकरी, शेतमजुरांची शेतात सोयाबीन काढण्यासाठी जाण्याची लगबग शेतात सोयाबीन काढण्यासाठी जाण्याची लगबग सुरू होती.

त्यामळे गावातील रस्त्यावरही चांगलीच वर्दळ होती. दरम्यान, बस पुढे न्यावी तर समोरच विद्युत खांबावर बस धडकण्याची भीती होती तर वर्दळीमुळे अनेकांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या परिस्थितीत चालकाने सतर्कता दाखवत बस एका बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बसची प्रल्हाद मुंडे यांच्या घराला धडक लागली. या अपघातात घराच्या भिंतीचा काही भाग कोसळला.

यामधेय बस जागेवरच थांबली. यावेळी अचानक मोठा आवाज झाल्याने गावकरी घटनास्थळी धावले तर बसमधील विद्यार्थिनींनी भीतीमुळे आरडा ओरड केली.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे, जमादार मारकड, जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी दुसरी बस बोलावून विद्यार्थिनींना सेनगाव येथे पाठविले. तर बस हळूवारपणे वटकळी फाटा येथे आणून उभी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

Hingoli news
अमरावती : धावत्या सिटी बसचे अचानक ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news