हिंगोली : पानकनेरगावच्या गायरानमधील अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस | पुढारी

हिंगोली : पानकनेरगावच्या गायरानमधील अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : गायरान अतिक्रमण धारकांवर कडक कारवाईसाठी सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील आज (दि. ४) ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणस्थळी मंडळ अधिकारी यांनी मंगळवारी भेट देऊनही उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलनकर्ते उपोषणावर ठाम आहे.

पानकनेरगांव हद्दीत गुरे चरण्यासाठी राखीव असलेले शासकीय गायरानमधील जागा काही समाजकंटकांकडून हडप करु पाहत असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांमध्ये पहायला मिळत आहे. या जागेतील झाडाची खुलेआम कत्तल करून त्यामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून पिक घेतल्याचा प्रकार घडत आहे. या अतिक्रमणधारकांपैकी काहींची आर्थिक स्थिती चांगली असूनही त्यांचा गुरे चरण्यासाठी असलेले राखीव क्षेत्र हडपण्याचा डाव आहे. सदर गायरान हे सार्वजनिक उपयोगात आले पाहिजे असा गावचा मानस आहे. त्यामुळे लवकर हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Back to top button