हिंगोली : मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन; जवळाबाजार बाजारपेठेतील आवक-जावक मंगळवारी बंद

हिंगोली : मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन; जवळाबाजार बाजारपेठेतील आवक-जावक मंगळवारी बंद

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन देत जवळाबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत बाजारपेठेची आवक व जावक मंगळवारी (दि. ३१) बंद ठेवण्यात येणार आहे. आडत व्यापारी वर्गाकडून यासंबंधी सचिव यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

आडत व्यापारी वर्गाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंबंधीचे बाजार समिती सचिव यांना आडत आज (दि. २७) व्यापारी वर्गाकडून लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी जवळाबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यापाऱ्यांकडून आडत बाजारपेठ आवक व जावक बंद ठेवून पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. जवळपास ४० ते ५० व्यापारी स्वाक्षरीचे हे निवेदन बाजार समितीतील सचिवांना देण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news