हिंगोली : दिग्रस बु परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का | पुढारी

हिंगोली : दिग्रस बु परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील दिग्रस बुद्रुक, रामेश्वर तांडा परिसरामध्ये आज (दि. 9 ऑक्टोबर) रात्री 8. 29 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने गावातील ग्रामस्थ घराबाहेर पडले होते. भूकंपाच्या सौम्य धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हापासून दिग्रस बुद्रुक येथील ग्रामस्थ रस्त्यावरच होते.

Back to top button