Hingoli : नहाद शिवारात ५२ वर्षीय शेतकर्‍याचा संशयास्पद मृत्यू

File Photo
File Photo
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील नहाद शिवारात एका शेतात ५२ वर्षीय शेतकर्‍याचा संशयास्पद मृत्यू झाला. सोमवारी (दि. २३) सकाळी ११ ही घटना उघडकीस आली. बालाजी तुकाराम तांभारे (वय ५२, रा. नहाद) असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. हट्टा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील नहाद शिवारात बालाजी तांभारे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातच आखाडा असून तांभारे हे रविवारी सायंकाळी शेतातील आखाड्यावर आले होते. त्यानंतर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाजेवर आढळून आला. तांभारे यांच्या पुतण्याने मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर हट्टा पोलिसांनाही माहिती देण्यात या घटनेची माहिती देण्यात आली.

 घटनेची माहिती मिळताच वसमतचे पोलिस उपाधिक्षक किशोर कांबळे, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक सतीष तावडे, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अद्याप पर्यंत हट्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news