हिंगोली : १० गुन्हे दाखल असलेला सराईत १ वर्षासाठी स्‍थानबद्ध

हिंगोली : १० गुन्हे दाखल असलेला सराईत १ वर्षासाठी स्‍थानबद्ध

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा शहर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे १० गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार संतोष विठ्ठल शेळके (रा. डिग्रस कऱ्हाळे) यास एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने (मंगळवार) काढले आहेत.

तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील संतोष शेळके याच्या विरुध्द दरोड्याचा प्रयत्न करणे, शासकिय कामात अडथळा आणणे, धमक्या देणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, चोरी यासारखे १० गुन्हे दाखल झाले आहेत. या शिवाय काही दिवसांपुर्वीच त्याने न्यायालयाच्या दरवाजाची काच फोडली होती. त्याला गुन्हेगारी वृत्ती पासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या विरुध्द ३ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सुधारण्याची संधी दिली होती. मात्र त्याच्या वर्तणुकीमध्ये फरक झालाच नाही.

दरम्यान, त्याच्या कृत्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी त्याच्यावर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती घेऊन त्याच्या विरुध्द स्थानबध्दतेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यावरून जिल्हा प्रशासनाने संतोष शेळके याच्या विरुध्द एक वर्षासाठी स्थानबध्दतेचे आदेश काढले आहेत. दरम्यान, मागील चार ते पाच महिन्यापासून गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपार व स्थानबध्दतेची कारवाई केली जात आहे. या कालावधीत झालेली हि १७ वी कारवाई असून, जिल्हयातील इतर पोलिस ठाण्यातूनही सराईत गुन्हेगारांची माहिती मागविण्यात आली. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

.हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news