औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत आहेत. यापैकी पाच ठिकाणी बिनविरोध झाले असून तीन ठिकाणी १८ मे रोजी निवडणूक होत आहे. परंतु, तीन ठिकाणी एकाही उमेदवारांने अर्ज दाखल न केल्याने या ठिकाणी निवडणूक विभागाला पुन्हा प्रक्रिया करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे पोटनिवडणुकाचा कार्यक्रम नव्याने सुरू होईल तर तर गुंडेगाव मूर्तिजापूर सावंगी संगणक तांडा हिवरखेडा नांदखेडा येथून एक एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे. आता १८ मे रोजी काकड दाबा दोन जागा जवळा बाजार एक रूपूर येथे एक एकच जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे
औंढा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक २०२३ त्यात रूपूर जवळा बाजार काकड दाबा या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतपेट्या वाहनातून रवा ना करताना तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव शैलेश वाईकर केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते उद्या 18 मे रोजी मतदान होणार आहे.