हिंगोली : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

हिंगोली : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथे बुधवारी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दीपक ओंकारआप्पा अकमार असे शेतकऱ्याचे नांव आहे.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील दीपक अकमार हा बुधवारी (दि.६) सकाळी नऊ वाजता शेतात जात होता. गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर एका शेतातून आलेल्या रानडुकराने दीपक याच्यावर हल्ला चढविला. यामध्ये रानडुकराने त्याच्या पायाचा चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दीपक घाबरून गेला. त्याने मदतीसाठी शेतकऱ्यांना आवाज दिला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी येऊन आरडाओरड केल्यानंतर रानडुकर पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दिपक याला नांदेड येथे उपारासाठी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, सेनगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. कळपाने राहणाऱ्या रानडुकराच्या भीतीमुळे शेतकरी देखील एकट्याने शेतात जाणे टाळत आहेत. तसेच मजूर देखील कामाला येत नसल्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वन विभागाने रानडुकराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news