File Photo
मराठवाडा
हिंगोली : पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला
हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील डिग्रस (कऱ्हाळे) परिसरात गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे डिग्रस गावालगत असलेल्या नदीला पूर आला. बुधवारी (दि. १९) रात्री या नदीच्या पुरात एक शेतकरी वाहून गेला. आज (दि. २०) सकाळी त्याचा मृतदेह हिवरा (जाटू) शिवारात आढळला. डिंगाबर सीताराम पारोकर (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हिवरा (जाटू) शिवारात गावकऱ्यांना नदीजवळ शेतकरी पारोकर यांचा मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी हिवरा (जाटू) येथे येऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मगन पवार, बीट जमादार विकी कुंदन व इतर कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

