

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : शेवाळा (ता.कळमनुरी) येथील योजना वाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या आणि शेतमजुरांवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केला. यात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.२५) सकाळी घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
पिसाळलेला कोल्ह्याने नागरिकांच्या पाय, हात व मानेला चावे घेतले आहेत. त्यांच्यावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. शंकर मारुती सूर्यवंशी, दीपक मारुती सूर्यवंशी, भास्कर गणेश पंडित, शंकरराव काशिनाथ सावंत, संजय सावंत, शेवाळा युवराज नरवाडे, युवराज नरवाडे अशी जखमींची नावे आहेत.
या घटनेनंतर वन परिक्षेत्र अधिकारी पुंडलिक होरे, वन परिमंडळ अधिकारी प्रिया सावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वन्य प्राण्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेवाळा येथील शिवसेनेचे युवा उपजिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. अरुण सावंत यांनी केली आहे.
हेही वाचलंत का ?