अंबाजोगाई - लातूर रोडवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार

मुसळधार पावसात अंदाज न आल्याने कार-कंटेनरची धडक
Fatal accident on Ambajogai - Latur Road; 4 people died on the spot
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; ४ जण जागीच ठारFile Photo
Published on
Updated on

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :

अंबाजोगाई -लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कार मधील चौघेही जागीच ठार झाले. सर्व मृत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील आहेत. आत्माराम बनापुरे, माधव खलांग्रे, सौदागर कांबळे व शिवराज डोम असे अपघातात ठार झालेल्या चौघांची नावे आहेत.

शनिवारी रात्री उशीरा जगलपूर येथील चारजण स्विफ्ट कार मधून (एमएच 24 एएस 6334) औरंगाबादला निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई-लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) जोरदार धडक झाली. हा अपघात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news