हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. औंढा नागनाथ तालुक्याला ३.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का रविवारी (दि.८) सकाळी पहाटे चार वाजून ३१ मिनिटांनी बसला. नागरिक साखर झोपेत असतानाच अचानक भूकंपाच्या हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ३.६ ची इतकी नोंदली गेली आहे.
तालुक्यातील राजदरी, पिंपळदरी, सोनवाडी, जामगव्हाण, तामठी तांडा, लोहरा तांडा इत्यादी ठिकाणांवर या भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भुकंपाचे धक्के बसल्यानंतर अनेक लोक घरातून बाहेर पडले. यापूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के बसले होते.