पाथरूड येथे तरुणाचा व्यवसाय जमीनदोस्त

पाटबंधारे विभागाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
dharashiv news
पाथरूड येथे तरुणाचा व्यवसाय जमीनदोस्त file photo
Published on
Updated on

Young man's business destroyed in Pathrud

भूम, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पाथरूड येथे लघुपाटबंधारे विभागाच्या कारवाईमुळे एका तरुणाचा पिढ्या‌न्पिढ्या चालत आलेला व्यवसाय उद्धस्त झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणामुळे ळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

dharashiv news
पीडब्ल्यूडीचा क्यूआर घोटाळा २ हजार कोटींचा

मिळालेल्या माहितीनुसार, न पाथरूड येथील अविनाश बलभीम न बोराडे यांचा गट क्रमांक १३९४ (सर्वे नं. १२४) मधील स्वतःच्या मालकीच्या जागेत व्यवसाय सुरू होता. १८ मार्च रोजी लघुपाटबंधारे व विभाग, भूम अंतर्गत पाथरूड सिंचन , शाखा क्र. १२ चे अधिकारी व , कर्मचारी अचानक घटनास्थळी दाखल जागा झाले.

कोणतीही पूर्वसूचना किंवा र नोटीस न देता जेसीबीच्या सहाय्याने ८, संबंधित व्यवसायाची जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप बोराडे यांनी केला आहे. या कारवाईत त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून उपजीविकेचे साधन पूर्णपणे नष्ट झाले आहे. या संदर्भात अविनाश बोराडे यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे.

dharashiv news
Jalgaon theft news | पारोळ्यात धाडसी डल्ला; साडेपाच लाखांची पिशवी लंपास

मी माझ्या मालकीच्या जागेत अधिकृत व्यवसाय करत होतो. मात्र मोजणी किंवा नोटीस न देता कारवाई करण्यात आली. न्याय न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची तक्रार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांनाही पाठविण्यात आली आहे. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news