Tuljapur Murder Case : तुळजापुरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून तरुणाची हत्या

चहाच्या टपरीवरून अपहरण : मित्रालाही अमानुष मारहाण
Murder Case
Murder Case Pudhari
Published on: 
Updated on: 

धाराशिव : तुळजापूर शहरात दोन तरुणांना झालेल्या बेदम मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला असून; दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयातून हा अमानुष प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाबाबत तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

घटनास्थळावरील माहितीनुसार, समीर जब्बार पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे, तर गंभीर जखमी अरबाज अफसर सय्यद याच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अरबाजने दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूरमध्ये टपरीवर चहा पीत असताना तिघांनी त्याला एका वाहनातून शेतात नेले. तेथे त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयितांनी अरबाजच्या मोबाईलची तपासणी केली. त्यामध्ये आक्षेपार्ह काहीही आढळले नसतानाही मारहाण सुरूच ठेवली. तसेच १० हजार रुपये काढून घेतले.

यानंतर संशयितांनी समीर पटेल याला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. तो येताच १५ ते २० जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत समीरचा मृत्यू झाला. यानंतर संशयितांनी अरबाजलाही मृत समजून तुळजापूर शहरातील वाहनतळ परिसरात टाकून पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.