

धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर तीर्थक्षेत्रामधील ड्रग तस्करी ७२ तासात बंद झाली पाहिजे, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना गुरूवारी (दि.२०) दिले.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी (दि.२०) तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर स्थानिक पुजाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेक पुजारी वर्गाने निवेदन देऊनही शहरातील ड्रग्स प्रकरणावर कारवाई होत नाही. शहरातील अनेक तरूण व्यसनाच्या आहारी गेले आहेत, असे स्थानिक पुजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी शहरातील ड्रग्स प्रकरणांचा छडा लावून आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.