Tuljapur jewellery theft : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

तुळजापूर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : तुळजापूर शहरात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटना शुक्रवारी (दि. २८) घडल्या. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत राधा उमाकांत भोसले (वय ४०, रा. संविधान कॉलनी, तांबरी विभाग, धाराशिव) या मैत्रिणीसह उमरगा ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये चढत होत्या. यावेळी जुने तुळजापूर बसस्थानक येथे दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले.

Crime News
Umarga ADIP camp : ‘ज्यांच्यासाठी शिबीर, त्यांचीच उपेक्षा!’

दुसऱ्या घटनेत नलिनी गुलाबराव भोसले (वय ५९, रा. माजलगाव, जि. सातारा, सध्या पुणे) या कुटुंबासह तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी १०.५० ते ११ वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिर ते महाद्वार या दरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने, किंमत सुमारे एक लाख रुपये, लंपास केले.

दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंदिर परिसर व बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढत असल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Crime News
Jalna News : नियम धाब्यावर, हेडलाईट डोळ्यावर!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news