

तुळजापूर : घाई गडबडीमध्ये राज्य पुरातत्त्व खात्याच्या अहवालावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा गाभारा आणि शिखर जीर्णोद्धाराचा निर्णय करू नये, केंद्रीय पुरातत्त्व खात्याला पाचरण करून अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी तुळजापुरात केली.
तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद संपन्न झाली तत्पूर्वी त्यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले दर्शनानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या शुभ हस्ते तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील, यांची उपस्थिती होती.
आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात बोललो असून तुळजाभवानी देवीच्या प्राचीन महात्म्याला लक्षात घेऊन तसेच कुलधर्म कुलाचार आणि तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा इतिहास अनुसरून केंद्रीय पुरातत् खात्याला प्राचारण करावे आणि त्यांच्या अहवालानंतर अंतिम निर्णय करावा अद्याप वेळ गेलेली नाही आपण देखील या महत्त्वाच्या कामासाठी वेळ देण्यास तयार आहोत असेही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
लोकांच्या भावना आणि मंदिराचे प्राचीन इतिहास टिकला पाहिजे तो पुढे चालला पाहिजे असे सांगून महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या या मंदिराचा विकास करताना गडबड करू नये असा सल्ला देखील त्यांनी मंदिर संस्थान विश्वास्तांना दिला आहे.