Tuljabhavani temple | तुळजाभवानी देवीच्‍या दर्शन व्‍यवस्‍थेत नवीन बदल गुरुवारपासून लागू!

सर्व प्रकारच्या भाविकांना एकाच ठिकाणाहून देवीचे दर्शन मिळेल
Tuljabhavani temple
Tuljabhavani temple
Published on
Updated on

तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी आणि दर्शन व्यवस्थेतील सुसूत्रता लक्षात घेऊन मंदिर संस्थानने दर्शन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ही नवीन व्यवस्था गुरुवार (दि. १८ जून) पासून लागू करण्यात आली असून, सर्व प्रकारच्या भाविकांना एकाच ठिकाणाहून देवीचे दर्शन मिळेल, अशी रचना करण्यात आली आहे.

नवीन व्यवस्थेनुसार ५०० रुपये देणगी दर्शन पासधारक आणि रेफरल देणगी दर्शन पासधारकांना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देऊन टोळभैरव पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपात नेले जाईल. २०० रुपये देणगी दर्शन पासधारकांना बिडकर पायऱ्यांमार्गे पहिल्या मजल्यावरील इमर्जन्सी गेटमधून प्रवेश दिला जाईल. धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चौथ्या मजल्यावरून रांगेत सामावून घेतले जाईल.

मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था तळमजल्यावर करण्यात आली असून, सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजेची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. या बदलामुळे ५०० रुपये, २०० रुपये देणगी दर्शन तसेच धर्मदर्शन रांगेतील भाविकांना सिंहाच्या गाभाऱ्यातून समान अंतरावरून देवीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे देणगी आणि सामान्य रांगांतील दर्शनस्थळातील फरक दूर होऊन सर्वांना समान पद्धतीने दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

यापूर्वी देणगी दर्शन रांगेमुळे धर्मदर्शनातील भाविकांना अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच सिंहासन व अभिषेक पूजा सुरू असताना देणगी दर्शन तात्पुरते थांबवावे लागत होते. नव्या व्यवस्थेमुळे अशा अडचणी कमी होऊन देणगी दर्शन अधिक सातत्याने सुरू ठेवणे शक्य होणार असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे. मंदिर प्रशासनाने सर्व भाविकांनी नव्या दर्शन व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news