Tuljabhavani Navratra | तुळजाभवानी मंदिरात पार पडला घटोत्‍थापन विधी!

Tuljabhavani Navratra | तुळजाभवानी मंदिरात पार पडला घटोत्‍थापन विधी!
Tuljabhavani Navratra | तुळजाभवानी मंदिरात पार पडला घटोत्‍थापन विधी!
Published on: 
Updated on: 

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची नवमी मंगळवारी (दि. २०) पारंपरिक धार्मिक विधींनी साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरात घट उठविण्याचा विधी पार पडला. ११ ऑक्टोबर रोजी विधिवत घटस्थापना करण्यात आली होती. नऊ दिवसांत विविध धार्मिक विधी, होमहवन आणि पूजाअर्चा करण्यात आल्या.

नवमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरात घट उठविण्याचा धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत हमरोजीबुवा यांच्यासह पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते. दर्शनासाभी भाविकांचीही मोठी उपस्‍थिती होती. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news