उमरगा, जकेकूर शिवारात वाघाचा वावर; वनविभागाच्या पथकाकडून शोधमोहीम

Dharashiv Tiger News | नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Umarga Jakekur tiger sighting
जकेकूर शिवारात वनविभागाच्या अधिकारी व पुणे येथील पथकाने वाघाच्या पायाच्या ठशांचा शोध घेतला.Pudhari Photo
Published on
Updated on

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जकेकूर शिवारात नागरिकांच्या नजरेला बुधवारी (दि १९) रात्री वाघ दिसून आल्याच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर येडशी येथून वाघाने आपला मोर्चा उमरगाकडे वळविल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२०) सकाळी वनविभागाच्या अधिकारी व पुणे येथील पथकाने परिसरात शोध घेतला. मात्र, कसलाही मागमूस सापडला नाही. (Dharashiv Tiger News)

धाराशिव जिल्ह्यातील येडशी अभयारण्यात दोन महिन्यांपासून वाघ वावरत आहे. यादरम्यान अनेक जनावरांवर हल्ला केला आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाची हालचाल कैद झाली. त्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी जागोजागी पिंजरा लावला. तरीही त्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. त्यातच उमरगा तालुक्यात वाघ आल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ग्रामसेवक लक्ष्मण जकेकुरे हे बुधवारी रात्री आठच्या सुमारास उमरगाच्या दिशेने येत होते. राष्ट्रीय महामार्गावरील जकेकुरवाडी पाटी येथे आले असता त्यांना समोरून अंगावर पट्टे असलेला प्राणी महामार्ग ओलांडत असलेला नजरेला पडला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. (Dharashiv Tiger News)

त्यानंतर काही वेळातच समाज माध्यमात जकेकूर शिवारात वाघ आला आहे, शेतकरी व नागरिकांनी सावध रहावे, असा मजकूर लिहून रात्रीच्या अंधारातील वाघाचे छायाचित्र व्हायरल झाले. आणि वाघ दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली. याची पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत रात्रीची गस्त वाढविली. मात्र, वाघाच्या भीतीने नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.

दरम्यान, आज सकाळी वनविभागाच्या अधिकारी व पुणे येथील पथकाने जकेकुर, येळी, जकेकूर वाडी, बलसूर, भुसणीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, वाघ किंवा अन्य प्राण्यांचा मागमूस लागला नाही. परिसरात केलेल्या पथकाच्या शोध मोहीमेत वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले नसल्याची चर्चा असून याबाबत उमरगा वन परिमंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर रात्रीच्या अंधारात महामार्ग ओलांडून गेलेला नेमका कोणता प्राणी होता. याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे याचे गूढ आणखी वाढले असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Umarga Jakekur tiger sighting
धाराशिव : पिकअप- दुचाकीचा भीषण अपघात; तिघे ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news