Snakebite : पावसाळ्यात वाढतोय सर्पदंशाचा धोका

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
The risk of snakebite increases during the monsoon season
Snakebite : पावसाळ्यात वाढतोय सर्पदंशाचा धोकाPudhari Photo
Published on
Updated on

The risk of snakebite increases during the monsoon season

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यात सापांच्या हालचाली वाढत असल्याने सर्पदंशाच्या घटना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातील वस्त्यांमध्येही साप आढळून येत असून शेतकरी व ग्रामस्थांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्पदंश झाल्यास तातडीने प्रथमोपचार करून रुग्णास जवळच्या रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक आहे.

The risk of snakebite increases during the monsoon season
Tuljabhavani Temple : 'तुळजाभवानी देवीचा मूळ गाभारा बदलू देणार नाही'

अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैद्यकीय उपचार घेणेच प्रभावी उपाय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये Anti-Snake Venom लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्पदंश टाळण्यासाठी खालील महत्त्वाच्या खबरदारी उपाययोजना राबवाव्यात शेतात काम करताना हातमोजे व पायमोजे वापरा-वेत, घराभोवती स्वच्छता ठेवावी.

सर्पदंश झाल्यास रुग्णाला घाबरवू नये, शक्य तितके शांत ठेवावे. दंश झालेल्या लावावी, पण ती जास्त घट्ट नको. १०८ क्रमांकावर किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी तातडीने संपर्क साधावा. मांत्रिक उपायांवर विश्वास ठेवू नये, जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. रुग्णाला चहा, कॉफी, दारू देऊ नये. अनावश्यक हालचाल टाळावी. रुग्णालयात पोहोचण्याआधी भ्रमणध्वनीवरून सूचना देणे फायदेशीर ठरते.

The risk of snakebite increases during the monsoon season
Sant Balumama : संत बाळूमामा पालखी सोहळ्यास भूम नगरीतून निरोप

सर्पदंश झालेल्या व्यक्तीस इतर आजार (जसे की दमा, अॅलर्जी) असल्यास हे वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्वरित कळवावे. शेतकरी आणि नागरिकांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी व सर्पदंश झाल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले.

मण्यार हा महाराष्ट्रातील अत्यंत विषारी सापांपैकी एक आहे. त्याचे विष नागाच्या विषापेक्षाही जहाल असते. तो साधारणपणे दीड मीटरपर्यंत लांब असतो. त्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. रात्रीच्या वेळी हा साप जास्त सक्रिय असतो आणि त्याच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही लक्षणीय आहे.

घोणस हा महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा अतिशय विषारी साप आहे. काहीसा अजगरासारखा दिसल्यामुळे अनेकजण त्याला चुकून अजगर समजून पकडायला जातात आणि त्यामुळे देशाचे प्रमाण वाढते. घोणसच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो.

नाग हा विषारी साप आहे. तो साधारणपणे १ ते २ मीटर लांब असतो आणि त्याचे डोके गोलाकार असते. याच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण बरेच आहे. नागाचे विष 'न्यूरोटॉक्सिक' प्रकारचे असते, जे शरीराच्या संवेदन प्रणालीवर परिणाम करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news