Two-Wheeler Modification : दुचाकी 'मॉडिफिकेशन'ची वाढती क्रेझ

उमरगा : स्टाईलच्या नादात सुरक्षिततेचा विसर
Two-Wheeler Modification
Two-Wheeler Modification : दुचाकी 'मॉडिफिकेशन'ची वाढती क्रेझfile photo
Published on
Updated on

The Growing Craze for Two-Wheeler Modification

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : अलीकडच्या काळात तरुणांमध्ये दुचाकी वाहनांचे मॉडिफिकेशन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाहन अधिक आकर्षक, स्टायलिश आणि वेगळे दिसावे यासाठी त्याच्या मूळ रचनेत बदल केले जात आहेत. मात्र, अशा अनधिकृत बदलांमुळे वाहतूक सुरक्षितता धोक्यात येत असून ध्वनीप्रदूषणासह अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

Two-Wheeler Modification
Parbhani News : परभणीत एफडीएची मोठी कारवाई; ३.४७ लाखांचा नियमबाह्य अन्नसाठा जप्त

दुचाकींवर आकर्षक स्टिकर्स, एलईडी दिवे, फॅन्सी सायलेंसर, अलॉय व्हील, सीट कस्टमायझेशन, हँडलबार बदल, रंगसंगतीतील बदल तसेच इंजिन व एक्झॉस्ट यंत्रणेत छेडछाड केली जात आहे. वाहन अधिक उठावदार दिसत असले तरी अशा बदलांमुळे उत्पादक कंपनीने निर्धारित केलेली सुरक्षितता व संतुलन बिघडू शकते.

विशेषतः फटाक्यांसारखा आवाज करणारे सायलेंसर, कर्णकर्कश हॉर्न आणि अतितीव्र प्रकाश देणारे एलईडी दिवे हे इतर वाहनचालक व नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे चालक दचकण्याच्या घटना घडतात, तर तीव्र प्रकाशामुळे समोरील वाहनचालकांची दृष्टी क्षणभर बाधित होऊन अपघाताचा धोका वाढतो.

Two-Wheeler Modification
New weapons competition | नव्या शस्त्र स्पर्धेच्या उंबरठ्यावर

वाहतूक तज्ज्ञांच्या मते, वाहनाच्या इंजिन, ब्रेक, चेसिस किंवा एक्झॉस्ट प्रणालीमध्ये अनधिकृत बदल केल्यास वाहनाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता कमी होऊ शकते. तसेच अपघात झाल्यास विमा दाव्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. दरम्यान, दुचाकी किंवा कोणत्याही वाहनावर नियमबाह्य प्रकाशयोजना, काळी फिल्म, कर्णकर्कश हॉर्न, फटाके फोडणारे सायलेंसर तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी सांगितले. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कायदा काय सांगतो?

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाच्या मूळ संरचनेत किंवा नोंदणी प्रमाणपत्रातील तपशीलांमध्ये परवानगीशिवाय बदल करणे नियमबाह्य आहे. फटाके फोडणारे सायलेंसर, कर्णकर्कश हॉर्न, काळी फिल्म, नियमबाह्य प्रकाशयोजना आणि ध्वनीप्रदूषण करणारी उपकरणे वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news