Windmill cable theft attempt : तांदूळवाडी शिवारात पवनचक्कीच्या तारांची चोरीचा प्रयत्न उधळला

वाहनासह मुद्देमाल जप्त, वाशी पोलिसांची तत्पर कारवाई; 8 ते 10 अज्ञात आरोपी फरार
windmill cable theft attempt
तांदूळवाडी शिवारात पवनचक्कीच्या तारांची चोरीचा प्रयत्न उधळलाpudhari photo
Published on
Updated on

वाशी : तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात आज्ञात चोरटे पवनचक्कीच्या ताराची चोरी करत आसल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळताच वाशी पोलिसांनी तत्पर कारवाई करत मुद्देमालासह वाहन जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवार, 6 रोजी रात्री वाशी पोलिस ठाण्यात पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती प्राप्त झाली की, वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात काही अनोळखी इसम सुमारे 8 ते 10 जण पवनचक्कीच्या तारा चोरी करत आहेत. सदर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक - शंकर शिंदे, पोहेका - कपिल बोरकर, पोहेका - बि . व्ही . यादव, पोका - औसारे, पोका - सय्यद, पोका -मलंगनेर , पोका - आघाव,पोका -शेळके व चालक सपोफौ - व्हंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

windmill cable theft attempt
Solapur News : एसटी स्टँड अस्वच्छ करणाऱ्यांना सव्वा लाखाचा दंड

घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, एमएच 44 यू 0246 क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा “छोटा हत्ती” प्रकारातील वाहन आढळून आले. सदर वाहनामध्ये पवनचक्कीच्या तारा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही पंचांच्या समक्ष सदर वाहन व त्यामधील तारा जप्त करून ताब्यात घेतले.

windmill cable theft attempt
Pune Dive Ghat Murder Case: शरीरसंबंधासाठी जबरदस्ती, आरडाओरड, डोक्यात दगड आणि...

पोलीसाचे चाहूल लागताच आज्ञात चोरटे पसार झाले आहेत .या प्रकरणी पुढील तपास मा.पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोकर , अप्पर पोलिस अधीक्षक -श्रीमती शफकत आमना व उपविभागीय पोलिस अधिकारी -अनिल चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाण्याकडून फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news