Unseasonal rain | पावसाच्या तडाख्यात सिरसाव येथे पपई बाग जमीनदोस्त

शासनाकडून तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे
Unseasonal rain | पावसाच्या तडाख्यात सिरसाव येथे पपई बाग जमीनदोस्त
Published on
Updated on

परंडा : मौजे सिरसाव येथे अवकाळी पावसाने दि. २२ रोजी जोरदार हजेरी लावत वादळी वाऱ्यासह मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी तानाजी मिसाळ यांच्या शेतातील सुमारे १ एकर पपई बाग पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे.

अचानक आलेल्या वादळामुळे उभी पिके मुळासकट उन्मळून पडली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पपईसारख्या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे.

याचबरोबर गावातील अनेक शेतकऱ्यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली, तर जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. शासनाकडून तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news