

कळंब : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांच्या गैरकारभाराची चौकशी लागली असुन उपसरपंच अमित माकोडे यांच्या तक्रारीवरून कळंबचे गटविकास अधिकारी यांच्या चौकशी अहवालात त्या दोषी आढळून आल्या आहेत. त्यांना धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि 14/7/25 रोजी पत्र काढून लेखी अभिलेखयासह व स्पष्टीकरणासह दि 17/7/ 25 रोजी धाराशिव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहाण्याचे सांगितले आहे. यामुळे तालुक्यातील सरपंच मध्ये खळबळ उडाली आहे.
सदरील पत्रात म्हटले आहे की माकोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचायत समिती स्तरावरील चौकशी अंती गटविकास अधिकारी कळंब यांनी सरपंचाविरूधद ग्रामपंचायत अधिनियम 39/1 नुसार कारवाई चा प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविलेला आहे व त्यास विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दोघांचेही म्हणणे ऐकून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ, अनियमितता, गैरव्यवहार विचारात घेऊन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे कळविले आहे.
1) 15 व्या वित्त आयोगातून पाणी पुरवठय़ाचया कामात 6 ठिकाणी पाईपलाईनवर वॉल तसेच 4 ठिकाणी रोडबॉकस न बसवता काम अपुर्ण असतानाही देयक अदा केल्यामुळे सरपंच यांनी कर्तव्यात दुर्लक्ष केल्याने दोषी आहेत
2) ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण येथील 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत आराखड्यानुसार काम करून घेणे बाबत कळवूनही अद्याप ही कामे केलेली नाहीत यासाठी सरपंच यांनी कर्तव्यात दुर्लक्ष केल्याने दोषी आहेत. अशा प्रकारे श्रीमती लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांनी महाराष्ट्र अधिनियम ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39/1 अन्वये कर्तव्यात दुर्लक्ष केल्यामुळे सरपंच पदावरून काढून टाकने योग्य वाटते. असे कळंब गटविकास अधिकारी यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या 17 तारखेला सरपंच काय लेखी पुरावा सादर करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यातून सरपंच म्हेत्रे यांचे पद जाणार की रहाणार हे 17 तारखेनंतरच समजेल परंतु कामात हयगय केल्याबद्दल प्रस्तावित कारवाईमुळे तालुक्यातील सरपंच मात्र चर्चेत आले आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक गावातील तक्रारी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मला सदरील पत्र प्राप्त झाले असून मी कुठलेही चुकीचे कामकाज केले नसून मी 17/7/25 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव येथे अभिलेख्यासह चौकशीला सामोरे जाणार आहे.
लक्ष्मी दिलीप म्हेत्रे, सरपंच शिराढोणलक्ष्मी दिलीप म्हेत्रे, सरपंच शिराढोण