

Vishwajit Patil was defeated by a margin of just 189 votes.
परंडा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बहुचर्चीत परंडा पालिकेच्या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत थरार पहायला मिळाला. शिवसेनेचे (शिंदे) ताकदवर नेते जाकेर सौदागर यांना जनशक्ती नगर विकास आघाडीचे तरुण नेते विश्वजित पाटील यांनी निकराची झुंज दिली. शेवटच्या फेरीपर्यंत श्वास रोखायला लावणार्या या निकालात अखेर सौदागर १८९ मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेना शिंदे विरुद्ध सर्वपक्षीय जनशक्ती नगर विकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली होती.
निवडणूक निकालात जनशक्ती नगर विकास आघाडीचे एकुण १२ उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे ८ उमेदवार विजयी झाले. असे असले तरी नगराध्यपदाच्या निवडी मध्ये चांगलीच चुरस पहावयास मिळाली. यामध्ये विश्वजीत पाटील यांनी ६६०६ एवढी मते मिळाली तर विरोधी सौदागर यांना ६७९५ मते मिळाली. विश्वजीत पाटील यांना १८९ मतांनी पराभुत केले. एकुण १३४६८ मतांची मतमोजणी करण्यात आली.
यात एकूण ६७ एवढे नोटाला मते मिळली. अध्यक्ष पदासाठी २ तर सदस्यपदाच्या २० जागांसाठी ४३ जणांनी आपले नशिव अजमावले होते. या मतमोजणी वेळी परांडा शहरातील एकूण १० प्रभागांसाठी ५ स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर ५ प्रशिक्षित कर्मचारी, अशा प्रकारे एकूण २५ प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. कामकाजासाठी कर्मचारी, तर सहाय्यक कामकाजासाठी ४ कर्मचारी नेमण्यात आले होते.
निकाल खालील प्रमाण प्रभाग १ अ रत्नमाला बनसोडे (आघाडी ९३८ मते १७३ मतांनी विजयी) तर आदिका पालके (शिव सेना ७६५ मते), मिनाक्षी बनसोडे ( अपक्ष ६७ मते), सुवर्णा बनसोडे ( ४३ मते), प्रभाग १ व श्रीकृष्ण विधाते (आघाडी ९४६ मते, १०४ मतांनी विजयी) संजय घाडगे ( शिवसेना ८४२), प्रभाग २ अ रुक्सानाबेगम पठाण (आघाडी ६८१ मते, ६१ मतांनी विजयी), फर्जनाबी मुजावर (शिवसेना ६२०), प्रभाग २ ब सरफराज कुरेशी (शिवसेना ६५१ मते ८ मतांनी विजयी) इस्माईल कुरेशी (आघाडी ६४३) प्रभाग ३ अ परवीन वासले ( आघाडी ७६२ मते १९८ मतांनी विजयी) गुलनार पठाण (शिवसेना ५६४ मते) प्रभाग ३ व मदनसिंह सद्दीवाल (आघाडी ७०९ मते ९९ मतांनी विजयी)
मदन दीक्षित (शिव-सेना ६१०), प्रभाग ४ अ मदीनाबी पठाण (आघाडी ६४१ मते ६४ मतांनी विजयी), जैतुनबी पठाण शिवसेना ५७७ प्रभाग ४ य समरजीतसिंह ठाकुर (आघाडी ६७६ मते, १४६ मतांनी विजयी), अजीम सौदागर (शिवसेना ५३०), नवनाथ कसबे (अपक्ष १६ मते), प्रभाग ५ अ शमीम तांबोळी (शिवसेना ६९१ मते, १०१ मतांनी विजयी) नंदाबाई जाधव (आघाडी ५९० मते ), प्रभाग ५ ब सत्तार पठाण
रईसोद्दीन मुजावर (आघाडी ६१३) प्रभाग ६ अ अनिल शिंदे (आघाडी ७९२, ३०६ मतांनी विजयी), जयंत शिंदे (शिवसेना ४८६), प्रभाग ६ व वैशाली अलबते (आघाडी ७९२, ३१२ मतांनी विजय), मनीषा मेहेर ( शिवसेना ४८०), प्रभाग ७ अ आब्बास मुजावर (आघाडी ९४३ मते , ६४ मतांनी विजय), इरफान शेख ( शिवसेना ८७९ मते), प्रभाग ७ ब रुखियाबी दहेलूस (आघाडी ९४० मते, ६९ विजय), कमल जगताप ( शिवसेना ८७१), प्रभाग ८ अ साबेर सौदागर (शिवसेना ९३१ मते, ३९९ मतांनी विजयी), गुले इरम चौधरी (आघाडी ५३२), प्रभाग ८ व आमीनावी मुजावर शिवसेना १००२ मते (आघाडीच्या शोभा जाधव (५४६ मतांनी विजयी), शोभा जाधव (आघाडी ४५६ मते) प्रभाग ९ अ मन्त्राबी जिनेरी ( शिवसेना ५६८ मते, १७८ मतांनी विजयी) हसीना पठाण (आघाडी ३९०), प्रभाग ९ ब चंद्रकांत गायकवाड (शिवसेना ५२९ मते, ९६ मतांनी विजयी उमाकांत गोरे ( आघाडी ४३३), प्रभाग १० अ वनमाला शिंदे (शिवसेना ५२५ मते, १४७ मतांनी विजयी) ज्योती सोनटक्के (आघाडी ३७८ मते) तर १० ब रमेशसिंह परदेशी (आघाडी ४६० मते, २३ मतांनी विजयी) व मोहसीन सौदागर (शिवसेना (४३७मते) सेना ६६३, ५० मतांनी विजयी)
मागणी फेटाळली
प्रभाग क्रं. व २ व अ८ सदस्य पदाची व नगराध्यक्ष पदासाठीची फेरमतमोजणीची मागणी जनशकती नगर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली होती परंतु समर्पक कारण नसल्याने निवडणुक अधिकारी यांनी त्यांची मागणी फेटाळली.