

Response to Maharajswa Samadhan Camp at Manekeshwar
भूम, पुढारी वृत्तसेवाः भूम तालुक्यातील मौजे माणकेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १) घेण्यात आले हे शिबीर महादेव मंदिर परिसरातील सभागृह येथे संपन्न झाले. या शिबिरास उपविभागीय अधिकारी डोंगरे, तहसिलदार जयवंत पाटील, पंचायत समिती सदस्य मनोज अंधारे, पंचायत समिती सदस्य प्रशांत मुंढेकर, नायब तहसीलदार प्रविण जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्री शिगारे, विस्तार अधिकारी प्रविण मिसाळ, सरपंच शामलताई कोळेकर माणकेश्वर, अभिमान जाधवर सरपंच तांबेवाडी, विशाल अंधारे उपसरपंच माणकेश्वर, मोइज सय्यद उपसरपंच शेकापूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीरात ३२४ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आहे. शिबीरामध्ये देण्यात आलेल्या सेवा/प्रमाणात प्रत्यक्ष लाभ दिलेल्या लाभार्थी संख्या अर्ज स्वीकारण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या शिबीरामध्ये निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची एकूण संख्या ११. ७/१२ दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जाची संख्या शुन्य, उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजीटल ७/१२ची संख्या (वारस नोंद घेतलेले खातेदार) ११८, उपलब्ध करून दिलेल्या ८अ उता-याची संख्या वारस नोंद घेतलेले खालेदार) ११०, वितरीत करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या जात प्रमाणपत्र ७,
रहिवाशी प्रमाणपत्र शुन्य, उत्पन्न प्रमाणपत्र १५, नॉन क्रिमीलेअर २, वय, अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ३, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र २, अल्प भूधारक ५ इ ब्लयू एस प्रमाणपत्र ९, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या एकूण अर्जाची संख्या ई मोजणी १, इतर लाभ संगायो (यूडी आय डी कार्ड आधार कार्ड संलग्न करणे) १६, आधार अपडेशन १०, आयुष्यमान कार्ड ७१, रेशनकार्ड दुरुस्ती/नवीन रेशनकार्ड ११, आरोग्य तपासणी ६३, एकात्मिक बाल विकास योजना (बेबी केअर कीट) १ या शिबीरात नगरीकांना तात्काळ प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मंडळ अधिकारी माणकेश्वर श्री खुळे, ग्राम महसूल अधिकारी माणकेश्वर श्री खळदकर व मंडळातील ग्राम महसूल अधिकारी आदींनी परिश्रम घेतले.