Dharashiv News : चाऱ्यासाठी ३० टक्के ऊस राखीव ठेवा!

मजुरांमार्फत ६० ते ७० टक्के ऊसतोडणीचे कारखान्यांना निर्देश
Dharashiv News
Dharashiv News : चाऱ्यासाठी ३० टक्के ऊस राखीव ठेवा!file photo
Published on: 
Updated on: 

Reserve 30 percent of the sugarcane for fodder!

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासह स्थानिक ऊसतोड मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना निर्देश दिले आहेत. एकूण ऊसतोडणीपैकी किमान ६० ते ७० टक्के ऊसतोडणी मजुरांमार्फत करावी आणि एकूण ऊस क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्रावरील ऊस चाऱ्यासाठी राखीव ठेवावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Dharashiv News
Dharashiv : पदवीधर निवडणुकीत ६२.५३ टक्के मतदान

हार्वेस्टरऐवजी मजुरांमार्फत ऊसतोडणी केल्यास जनावरांसाठी उपयुक्त असलेल्या हिख्या वाढ्याची उपलब्धता वाढू शकते. त्याचबरोबर स्थानिक मजुरांना रोजगार मिळून त्यांचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल. त्यामुळे ऊसतोडणीचे नियोजन करताना मजुरांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी ३० टक्के ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी राखून ठेवावा. तसेच उसाच्या वाढ्याची शक्यतो कारखानास्तरावर साठवणूक करून दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद आहे.

Dharashiv News
Dharashiv News : जोगव्याच्या परडीत फुले अन् क्यूआर कोडद्वारे पैसे !

कारखान्यांनी केलेल्या कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१, सहकारी संस्था (साखर), धाराशिव यांच्याकडे सादर करावा. निर्देशांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ आणि अन्य लागू तरतुर्दीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

बगॅस आणि मळीचाही राखीव साठा

प्रत्येक सहकारी व खासगी साखर कारखान्याने उत्पादित बगॅस आणि मळी यांपैकी प्रत्येकी ३० टक्के साठा दुष्काळ निवारण, चारा व पशुखाद्य निर्मितीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हा साठा विक्रीसाठी किंवा अन्य कामांसाठी वापरता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news