Dharashiv News : धाराशिव तालुक्यात रब्बी पेरणीला सुरुवात; शेतकऱ्यांची चिंता कायम

परतीच्या पावसामुळे पेरणीला विलंब झाला असून, सध्या तालुक्यात सुमारे ४० टक्के पेरणी झाल्याचे चित्र आहे.
Dharashiv News
Dharashiv News : धाराशिव तालुक्यात रब्बी पेरणीला सुरुवात; शेतकऱ्यांची चिंता कायम File Photo
Published on
Updated on

Rabi sowing begins in Dharashiv taluka; Farmers' concerns remain

कसबे तडवळे, पुढारी वृत्तसेवा धाराशिव तालुक्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ठेवली होती. परंतु सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पेरणीला विलंब झाला असून, सध्या तालुक्यात सुमारे ४० टक्के पेरणी झाल्याचे चित्र आहे.

Dharashiv News
Rabi Season : रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढणार, गव्हाला अधिक पसंती

मागील काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने आणि थंडीची चाहूल लागल्याने जमिनीचा वापसा होऊ लागला असून, अनेक ठिकाणी रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. तडवळे परिसरासह काही गावांमध्ये शेतकरी पेरणीसाठी शेतात उतरलेले दिसत आहेत.

दरम्यान, सततच्या पावसामुळे काही ठिकाणी आधीच पेरणी झालेल्या क्षेत्रात पाणी साचल्याने बीज कुजणे, अंकुर न येणे, रोपे मरून जाणे अशा समस्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Dharashiv News
Thackeray Sena : उबाठा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

खरिपातील अतिवृष्टी आणि रब्बीतील विलंबित पेरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. रब्बी ही जाते का धावून? असा सवाल सध्या धाराशिव तालुक्यातील शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news