अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

पिंपळगाव येथील घटना
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
File photo
Published on
Updated on

वाशी : दुचाकी आणि अज्ञात वाहनाच्या झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील इतर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील पिंपळगाव (क.) येथील वळणावर शुक्रवारी (दि. ३१) दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव (क.) येथील पारधी पेढीवरील रहिवासी धनेश सुबराव शिंदे (वय २०) हा वाशी येथून पिंपळगाव (क.) येथे त्याच्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाची मोटार सायकलला जोराची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील धनेश शिंदे हा जागीच मयत झाला तर दुचाकी वरील इतर दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन मयत धनेश शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तर गंभीर जखमींना बीड येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सूरू होती. पुढील तपास बळीराम यादव हे करीत असून अज्ञात वाहनाचा तपास घेण्याचे काम वाशी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news