Dharashiv News : नवीन सर्व्हिस रोड धोकादायक; अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त

धाराशिव : वरुडा चौक ते सांजा चौक कामादरम्यान अनेक त्रुटी
Dharashiv News
Dharashiv News : नवीन सर्व्हिस रोड धोकादायक; अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्तFile Photo
Published on
Updated on

New service road is dangerous; Citizens suffer due to incomplete work

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर घुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडचे काम मार्गी लागले असले तरी अद्याप अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी कायम आहेत. या त्रुटी दुर्लक्षित करून रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देत नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.

Dharashiv News
Khandoba Yatra : अणदूर येथील खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडचे काम २०२४ च्या पावसाळ्यात सुरू झाले होते. दीड वर्ष उलटूनही रस्त्याचे काम अपूर्ण असून अनेक ठिकाणी धोकादायक दोष कायम आहेत. सांजा चौक ते वरुडा चौक या दरम्यानच्या मार्गावर सर्वाधिक त्रुटी दिसून येत आहेत. टापरे बिल्डिंग ते सांजा चौक दरम्यान अनेक भागांमध्ये डांबरीकरणाचे अंतीम थर टाकलेले नाहीत. काही ठिकाणी अर्धवट डांबरीकरण आहे.

शिवनेरी नगरकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरील नाल्यांचे स्लॅब तुटलेले असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर श्री साई हटिलसमोर नालीचे काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात तुडूंब वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी पुन्हा रस्त्यावर येणार आहे.

Dharashiv News
Pratap Sarnaik : शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एस.टी.ची लवकरच हेल्पलाईन

सुरक्षाजाळीच लावली नाही

साई कमल हॉटेलसमोर सुरक्षाजाळी लावलेली नसणे आणि अंतिम डांबरी थर न टाकल्यामुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे. पुढे सांजा चौकाच्या दिशेने पुलाजवळ जिथे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्याला मिळतो, त्या ठिकाणीही डांबरीकरण बाकी आहे. त्यामुळे दुचाकीस्वार सतत किरकोळ अपघातांना सामोरे जात आहेत. अनेकांना किरकोळ जखमी व्हावे लागत आहे. येथून शालेय विद्यार्थी वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे सतत वर्दळ असते. याचा धोका भविष्यात गंभीर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news