Naldurg Fort : नळदुर्ग किल्ल्यावरुन पडून आईसह पाच वर्षाच्या मुलाचा मृत्‍यू, अडीच वर्षीय जुळ्या मुलीही गंभीर जखमी !

किल्ला पाहण्यासाठी गेल्यावर घडली दुर्घटना, आत्‍महत्‍या की अपघात याबाबत संदिग्धता
Naldurg Fort : नळदुर्ग किल्ल्यावरुन पडून आईसह पाच वर्षाच्या मुलाचा मृत्‍यू, अडीच वर्षीय जुळ्या मुलीही गंभीर जखमी !
Naldurg Fort : नळदुर्ग किल्ल्यावरुन पडून आईसह पाच वर्षाच्या मुलाचा मृत्‍यू, अडीच वर्षीय जुळ्या मुलीही गंभीर जखमी !
Published on
Updated on

नळदुर्ग, : एक मुलगा आणि दोन मुलींना किल्ला पाहण्यासाठी घेऊन गेलेली आई नळदुर्ग च्या ऐतिहासिक किल्ल्यातील उपली बुरुजवरून पडल्याने झालेल्या दुर्घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अडीच वर्षाच्या दोन जुळ्या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत, ही घटना गुरुवार दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी एक ते दोन च्या सुमारास घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की, नळदुर्ग चा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आंबूलगा ता. निलंगा येथील अश्विनी मनोहर पौळ वय 28 ही आपल्या दोन मुली आणि एक मुलगा यांना घेऊन आली होती. दरम्यान किल्ल्यातील उपली बुरुज पाहण्यासाठी बुरुजवर गेल्यानंतर अश्विनी ही आपल्या तिन्ही लेकरासह बुरुजवरून खाली पडली, या झालेल्या दुर्घटनेत अश्विनी व तिचा मुलगा अजिंक्य वय 5 यांचा जागीच मृत्यू झाला.

तर दोन जुळ्या मुली वीरा व क्रांती वय 3 या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड व त्यांचे सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमी मुलींना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचार करून वैद्यकीय अधिकारी श्रेमती बोडके यांनी पुढील उपचारासाठी धाराशिव येथे पाठवून दिले.

अजूनपर्यंत घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती. मात्र झालेली घटना ही आत्महत्या आहे की बुरुजवरून पडून झाली या बाबत काहीही समजू शकले नाही. दरम्यान अश्विनी ही गेल्या तीन महिन्यापासून वंताळ ता. उमरगा येथे आपले वडील तानाजी शिवाजी मोहिते यांच्याकडे होती तर पती मनोहर पौळ हा मुंबई येथे रिक्षा चालक असल्याचे समजले आहे तर अश्विनी ही मुंबई मेट्रो पोलीस मध्ये असल्याचे समजले आहे,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news