

Minister Rane visited Tulja Bhavani Temple
धाराशिव : पुढारी वृत्तसेवा
बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मंत्री श्री. राणे यांचा मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन) तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पुष्पगुच्छाने स्वागत करून कवड्यांची माळ आणि श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला.
दरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी महाद्वारासमोर त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर प्लास्टिक वापरू नका कापडी पिशव्यांचा वापर करा असा संदेश दिला.
पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अनिल काळे, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, बंटी गंगणे, धैर्यशील दरेकर, पर्यावरण मंत्रालयाकडून सध्या नो प्लास्टिक उपक्रम सुरू असून त्याबाबत सध्या महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवर जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
याचाच एक भाग म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन मंदिर समिती येथे या उपक्रमाबाबत बैठक घेतली. बैठकीमध्ये त्यांनी मंदिर समितीला नो प्लास्टिक मोहीम राबविण्यासाठी आवाहन केले.
त्यांनी मंदिर संस्थान येथे भाविकांना, विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. यावेळी अरविंद बोळंगे यांनी त्यांचे स्वागत व महावस्त्रे देऊन सत्कार केला. पुजारी राम छत्रे यांनी पंकजा मुंडे यांची पूजा केली.