नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी स्वीकारला पदभार

तुळजापूरचा कायापालट करणार : आ. राणा जगजितसिंह पाटील
Tuljapur News
नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी स्वीकारला पदभारFile Photo
Published on
Updated on

Mayor Vinod Gangane took charge

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा निधी कमी पडणार नाही. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करू, अशी ग्वाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूरकरांना दिली. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून प्रशासनाच्या वतीने विनोद गंगणे यांचा आमदार राणा जगजितसिंह पाटील व मुख्याधिकारी आदित्य रणदिवे यांच्या हस्ते सत्कार झाला.

Tuljapur News
धाराशिवला आढळला 500 वर्षे जुना ऐतिहासिक शिलालेख

सोमवारी दुपारी बारा वाजता नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदित्य रणदिवे यांनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार विनोद गंगणे यांच्याकडे सुपुत्र केला आणि त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या खु र्चीवर विनोद गंगणे विराजमान झाले. याप्रसंगी त्यांना आ. पाटील, अर्चना पाटील, महंत तुकोजी महाराज, महंत वाकोजी महाराज, मल्हार पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे, माजी तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, भाजपा नेते विक्रम देशमुख, प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, विशाल रोचकरी, विशाल छत्रे, अमर हंगरगेकर, ज्येष्ठ नगरसेवक पंडित जगदाळे, संतोष कदम, सचिन रोचकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना पालिकेच्या वतीने फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आ. पाटील यांनी तुळजापूरला येणारा भाविकांचा विचार करून तुळजापूरचा विकास करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीमधून निश्चितपणे आगामी काळात चांगला विकास केला जाईल.

Tuljapur News
शहर विकासाचा आ. पाटील यांचा अजेंडा भक्कम करणार : विनोद गंगणे

२०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे हजारो कोटी रुपयांचा निधी आज आपल्या जिल्ह्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आलेला आहे या निधीचा उपयोग सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या हितासाठी करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी नगराध्यक्ष गंगणे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. पाटील यांच्या दृष्टिक्षेपात असणारा तुळजापूरचा विकास करण्यासाठी आपण निश्चितपणे काम करू. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देताना नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. सरकारच्या ध्येय धोरणानुसार नगरपालिकेचा कारभार करताना सर्वांना समान न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news