

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: लातूर मुंबई तसेच बिदर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला कायमस्वरुपी तीन एसी डबे वाढवल्याने प्रवाशांना आता 'वेटिंग'चे टेन्शन कमी होणार आहे. पाठपुराव्याची दखल घेतल्याने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहे.
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मुंबईला जाण्यासाठी लातूर तसेच धाराशिवहून रात्री ही एकमेव रेल्वे असल्याने प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असतो. परिणामी, अनेकदा वेटिंगची तिकीटे कन्फर्म होत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अन्य साधनांचा वापर करावा लागत होता.
याबाबत आपण सातत्याने सोलापूर रेल्वे विभागाच्या बैठकीत मागणी केली होती. त्यानंतर महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता रेल्वे मंत्रालयाने या गाडीसाठी टू टायर एसी १ व श्री टायर एसी २ असे डबे वाढवले आहेत. यामुळे १८ डब्यांची ही एक्सप्रेस आता २१ डब्यांची झाली आहे. यामुळे खा. राजेनिंबाळकर यांनी आभार मानले आहेत.