

कळंब: नगरपालीकेच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर शिवसेना व भाजपच्या उमेदवार सुनंदा शिवाजी कापसे यांनी उबाठा शिवसेना व कॉंग्रेस पक्षाच्या रश्मी संजय मुंदडा यांच्या वर 2254 मतांची आघाडी घेत विजयी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रा मिनाक्षी भवर यांना तीन नंबर क्रमांकाची मते मिळाली आहेत. यामध्ये कापसे यांना 7689 मुंदडा यांना 5435 व भवर यांना 1760 मते मिळाली आहेत. कापसे यांनी 2254 मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली आहे.
भारतीय जनता पक्षाने 1992 नंतर कळंब नगरपालीकेत षटकार मारत पुन्हा प्रवेश केला आहे भाजपचे शितल चोंदे, योजना वाघमारे, लखन गायकवाड, हर्षद अंबुरे, पवार शाला, भुषण करंजकर हे विजयी झाले आहेत तर शिवसेनेचे रोहन पारख, धोकटे पुजा, अमर चाउस, अतुल कवडे विजयी झाले आहेत.
शिवसेना उबाठा व कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या रश्मी मुंदडा यांचा पराभव झाला असला तरी पक्षाने नऊ जागा जिंकून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. यामध्ये ज्योती हारकर, खाटीक जमील, हौसलमल इंदुमती, आशा भवर, सागर मुंडे, सफुरा काझी, वनमाला वाघमारे, मोसीन मिर्झा, बागवान रूकसाना विजयी झाले आहेत तर कॉंग्रेस पक्षाच्या अर्चना प्रताप मोरे या विजयी झाल्या आहेत.
उबाठा शिवसेना व कॉंग्रेस पक्षाने ओबीसी फॅक्टर राबवत मुंदडा यांनी उमेदवारी दिली होती व निवडणूक काळात ओबीसी उमेदवार कविता गोरे यांचा पाठिंबा घेत वातावरण निर्मिती केली होती परंतु मतदारांनी हा फॅक्टर सपशेल नाकारल्याचे दिसून येत आहे.