Vehicles Illegal LED Lights : वाहनांच्या नियमबाह्य एलईडी लाईट ठरताहेत जीवघेण्या

तीव्र प्रकाशामुळे अपघातांत वाढ; कारवाईची मागणी
Vehicles Illegal LED Lights
Vehicles Illegal LED Lights : वाहनांच्या नियमबाह्य एलईडी लाईट ठरताहेत जीवघेण्याFile Photo
Published on
Updated on

Illegal LED lights in vehicles are becoming life-threatening

शंकर बिराजदार

उमरगा शहर व तालुक्यात वाहनांच्या लाइट बदलून एलईडी लाईटच्या वापरात चांगली वाढ झाली आहे. यात हेडलाइटबाबत नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे एलईडी लाईटचा वापर इतरांसाठी जीवघेणा ठरत आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Vehicles Illegal LED Lights
Dharashiv News : उमरगा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

शहर व परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक जण आपल्या वाहनात काहीतरी वेगळे असावे, याकडे लक्ष देत आहे. काही शौकीन वाहन चालक इतरांचा विचार न करता बेकायदेश-ीरपणे चमकदार एलईडी दिवे गाडीला लावत आहेत.

परंतु, हेच हेडलाईट पादचारी आणि वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. कोणत्याही वाहनाचे हेडलाइट संबंधित विभागाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार बसविले जातात. तथापि, काही उत्साही लोक मयदिच्या पलीकडे जाऊन त्यांच्या वाहनांमध्ये एलईडी दिवे लावतात.

Vehicles Illegal LED Lights
Shaktipeeth Highway : धाराशिवला शक्तिपीठची मोजणी स्थगित, राजू शेट्टी यांच्या आक्रमक आंदोलनानंतर प्रशासनाचा निर्णय

विशेषतः कार, जीप आदी चारचाकी वाहनांवर हेडलाईटच्या शेजारी एलईडी दिवे बसविण्याची फॅशन आहे. या एलईडी लाईटचा प्रकाश इतका तीव्र असतो की, समोरून येणाऱ्या वाहन चालकाचे डोळे दीपून जातात. प्रकाश असह्य होऊन सामान्य वाहन चालक डोळे मिटतो किंवा गाडी थेट उभी करतो.

यामुळे रात्रीच्या वेळी पादचारी व दुचाकी चालकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे, रात्री प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. परंतु, असे लाईट्स बसवलेले असतानाही या वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. वास्तविक पाहता वाहन उत्पादक कंपनीने बनवलेल्या वाहनात कोणताही बाह्य बदल करणे नियमबाह्य आहे.

परंतु, कार डेकोरेट्स करणाऱ्या हेडलाईट्स सहजरीत्या बदलून मिळतात. अशा बाबीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. अशांवर कडक कारवाई केल्यास हेडलाईट बदलाचे मार्ग बंद होतील, अशी अपेक्षा जनतेत केली जात आहे. मात्र, अशा बाबींवर कारवाई होत नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण विशेषतः कार, जीप आदी चारचाकी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news